देशभक्तीपर गीतांचे पुणे मेट्रो मध्ये बसून सादरीकरण करीत ३०० विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आगळीवेगळी मानवंदना दिली. हर घर तिरंगा अभियानाला प्रतिसाद देत तिरंगी ध्वज हातात घेऊन भारत माता की जय, असा जयघोष करीत विद्यार्थ्यांनी मेट्रोची सफर केली.